Lyrics King

Lyrics King
New website For Hindi Lyrics

भीमसूर्य क्रांतीचा पाहिला संविधानात लिरिक्स | Bhim Surya Kranticha Pahila Savidhanat Lyrics


भीमसूर्य क्रांतीचा पाहिला संविधानात लिरिक्स | Bhim Surya Kranticha Pahila Savidhanat Lyrics
-------------------------------------------------------------

मराठी लिरिक्स 

भीमसूर्य क्रांतीचा, पाहिला विधानात

बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात



पाडली अशी खाली, माजलेली विषमता

डाव होते समतेचे, भीम पहिलवानात



जात पोळली माझी, रुढीच्या निखाऱ्यावर

फूल आले क्रांतीचे, या वाळलेल्या रानात



गावकीचा जोहार, संपला आता माझा

दिल्ली आम्ही पाहिली, त्या भीम संविधानात



बाटली बैलगाडी, काल आमच्या स्पर्शाने

मी टाय कोट घालूनी, आता चाललो विमानात



बुद्धीच्या किनाऱ्यावर, विश्व तू चकित केले

हो 

"बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते

समतेच्या भावनातील चंदन भीमात होते

तालात जीवनाच्या विषमता नाचली ही

न्यायाची रागदारी, गुंजन भीमात होते



संकल्प या मनाचा, क्रांती करून गेला, 

निधड्या मनाचा मोठा, होऊन सिंह गेला

दीपविले कैक ज्ञानी, माझ्या धुरंधराने

इतिहास घडविला, माझ्या युगंधराने



ही आस नाही केली, श्रीमंतीच्या धनाची

फुलविली बाग ऐसी, येथे परिश्रमाची,

दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा

गुणवंत पाहिला मी, अन्यायी झुंजणारा



विसरून गेला शेवटी, जातीयतेची ज्वाला

भीमराव माणसाला, माणूस करून गेला

काळाच्या डोळ्यावरती, बसलेली होती कात

तू दाविली पहाट, उज्ज्वल प्रखर ती ज्योत



न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता

या दीन बांधवांना आदर्श तुझा होता



बंधुत्व न्याय ज्याने ह्रदयात साठविले

दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले"



बुद्धीच्या किनाऱ्यावर, विश्व तू चकित केले

पाहिला महासागर, पुस्तकाच्या ज्ञानात

बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Previous
Next Post »